यंदाचे गणपती पोलीसांसाठी जबाबदारीचं ठरले आहेत. ज्याप्रकारच्या घटना रोजच्या रोज कानावर पडत आहेत त्यावरून पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. स्त्रीयांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून तसेच गणेश मंडळाकडू काही नियमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. गणपती दरम्यान कोणत्याही प्रकाचे गैरकृत्य होऊ नये यासाठी पोलीसांची प्रत्येकावर नजर ठेवण्यात येणार आहे.
अशातच नागपूर पोलीस देखील गणेशोत्सवासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूर शहरात 6 हजार पोलीस आणि होमगार्ड तैनात असणार आहे. तसेच नागपूर शहरातील सुमारे चौदाशे हून अधिक मंडळामध्ये गणपती बाप्पाची स्थापना होण्याची शक्यता आहे. त्याकरिता गणेश मंडळांना सुरक्षा व्यवस्थेसोबत ध्वनी प्रदूषणाच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डीजे किंवा मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिमचा वापर केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून कोणती ही पुरुष एखाद्या महिलेसोबत गैरकृत्य किंवा छेडछाड करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.